Marathi Kavita Aai
आई ,तुझे किती । प्रेमळ बोलणे ।
प्रेमळ हासणे । धैर्य देते ॥
प्रेमळ हा स्पर्श । प्रेमळ उपदेश ।
कार्यही सफल । होते त्याने ॥
प्रेमळ हे हात । प्रेमळ हा घास ।
प्रेमळ मनाने । खाऊ घाली ॥
प्रेमळ आईचे । प्रेमळ लेकरु ।
आईची थोरवी । जाणून आहे ॥
इतुके प्रेमळ । घर हे आपुले ।
आई , तुझ्या ऋणी । राहो सदा ॥
0 comments:
Post a Comment