भरली भेंडी Marathi recipes
भरली भेंडी
साहित्य -
10-12 भेंडी धुवून पुसून घ्यावीत. देठ आणि टोकं कापून टाकावीत व मधे उभी चीर द्यावी.
6-7 पाकळ्या लसूण ठेचून घ्यावी.
तेल (फोडणीसाठी) 1 मोठा चमचा.
भरण्यासाठीचा मसाला -
1. बेसन 1 मोठा चमचा
2. शेंगदाण्याचे कुट 2 मोठा चमचा
3. हिंग (चिमटीभर)
4. हळद 1/2 छोटा चमचा
5. लाल मिरची पावडर 2 छोटा चमचा
6. मिठ (चवीनुसार)
कृती -
1. सगळे साहित्य करुन एकत्र मसाला तयार करुन घ्यावा.
2. चीर दिलेल्या भेंड्यांमध्ये मसाला भरुन घ्यावा. शिल्लक मसाला भेंड्यांना बाहेरुन सुद्धा लावावा.
3. तेलाची फोडणी करुन त्यात लसूण पाकळ्या घालाव्यात.
4. त्यात भरलेली भेंडी नीट लावावीत. शिल्लक मसाला घालावा.
5. झाकण ठेवून, मंद गॅसवर शिजवावीत.
6. पाणी अजिबात घालू नये. थोडी शिजली की, झाकण काढून, पुन्हा थोडे तेल सोडून, खरपूस, चुरचुरीत होईपर्यंत हलवत राहावे.
7. वरुन कोथिंबीर घालून आणि भाजी वाढायला घ्यावी
0 comments:
Post a Comment