क्रांतिकारकांचे सेनापती, स्वातंत्र्यसैनिकांचे अग्रणी, हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्त्वज्ञ व सक्रिय हिंदू संघटक; क्रियाशील धर्मसुधारक व समाजसुधारक; प्रेरणादायी महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता यांबाबत प्रखर विचार मांडणारे विचारवंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...
एक थोर साहित्यिक म्हणूनही महाराष्ट्र सावरकरांना ओळखतो. जोसेफ मॅझिनी (इटालियन क्रांतिकारकाचे चरित्र), ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, ‘शिखांचा इतिहास’, ‘माझी जन्मठेप’, ‘सन्यस्त खड्ग’ (नाटक), ‘काळे पाणी’, ‘मला काय त्याचे’, ‘हिंदुत्व’, ‘गोमंतक’ असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’, ‘जयदेव जयदेव जय जय शिवराया’ ही शिवरायांची आरती; ने मजसि ने परत मातृभूमिला, सागरा प्राण तळमळला - यासारखी अजरामर काव्ये लिहिणार्या सावरकरांनी ‘कमला’ हा काव्यसंग‘हही लिहिला. १९३८ सालच्या मुंबईतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना सावरकरांनी ‘लेखण्या मोडा, बुंदुका हातात घ्या’ व ‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे, शास्त्रचिंता प्रवर्तते’ असे संदेश तत्कालीन साहित्यिकांना व वाचकांना दिले. भाषाशुद्धीवरही त्यांचा विशेष भर असे. ‘महापौर’, ‘नगरसेवक’, ‘महानगरपालिका’ इत्यादी शब्द सावरकरांनीच व्यवहारात आणले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन कॉंग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अश अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त @Assal Marathi sms comedy पानातर्फे विनम्र अभिवादन....
0 comments:
Post a Comment