Breaking News
Loading...
Monday, 27 May 2013

Info Post
संन्याशाला फाशी

गेल्या आठवड्यात वेस्टर्न रेल्वेवर रेल्वे पोलिसांनी 'एकाला' अटक केली. लोकलमध्ये भीक मागणे, जोरात आवाजात बोलणे आणि सरकारी कामकाजात व्यत्यय आणणे हे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. ही व्यक्ती म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून आहेत प्रा. संदीप देसाई. शाळा उभारणीसाठी लोकांकडून निधी गोळा करणारे. दररोज शेकडो भिकारी, फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष करून पोलिसांनी मात्र संन्यासाला पकडून कर्तव्य बजावले होते...

मुंबईत राहणाऱ्यांना, त्यातही प्रामुख्याने वेस्टर्न लाइनवर राहणाऱ्यांना प्रा. संदीप देसाई माहिती नाही असा माणूस सापडणे कठीणच. नाव माहिती नसले तरी शाळा उभारणीसाठी लोकलमधून दान गोळा करणारा माणून तर नक्कीच सर्वांना माहीत आहे. गेल्या आठवड्यात रात्री १०-१०.३० वाजता लोकलमध्ये नेहमीप्रमाणे दान गोळा करणाऱ्या देसाई यांना रेल्वे पोलिसांच्या एका अति 'कर्तव्यदक्ष' सीनिअर पोलिस इन्स्पेक्टरनी अटक केली. भीक मागणे, जोरात आवाजात बोलणे आणि सरकारी कामकाजात व्यत्यय आणणे हे त्यांनी केलेले गुन्हे. रात्री १०.३० वाजता पकडून त्यांना वांद्र्याच्या पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. कर्तव्यदक्षांनी त्यांची 'इन-कॅमेरा' चौकशीचेही आदेश दिले. सकाळी अटक होईपर्यंत त्यांना 'लॉक-अप'मध्ये ठेवण्याची तयारी कनिष्ठ पदावरील पोलिसांनी सुरू केली होती. कारण वरिष्ठांच्या आदेशापुढे त्यांचा नाईलाज होता. अखेर देसाईंनी आरोपींची चौकशी केल्यावर 'लॉक-अप'मध्ये ठेवण्यालायक एकही गंभीर गुन्हा त्यांनी केलेला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर साडेतीन हजार रुपयांच्या बॉण्डवर सकाळी कोर्टात हजर राहण्याची अट ठेवून त्यांना रात्री २ वाजता घरी सोडण्यात आले. सकाळी कोर्टात न्यायाधीशांसमोर उभे राहताच, न्यायाधीशांनी त्यांना विचारले, 'बोला प्राध्यापक, तुमच्या शाळा कशा सुरू आहेत?'. पुढे सुनावणीत त्यांच्यावरील आरोप त्यांना सांगण्यात आले. त्या देसाई म्हणाले, माझी संस्था मुंबई पब्लिक ट्रस्ट कायद्यानुसार नोंदणीकृत असून त्यानुसार दान गोळा करण्याचा मला हक्क आहे. मात्र रेल्वे त्याला भीक समजते यात माझी काय चूक?. माझ्या कामाचा भाग म्हणून अधिकाधिक लोकांना माझे म्हणणे ऐकून जावे म्हणून मला जोरात बोलावे लागते. आणि जर मी पोलिसांना कामात अडथळा केला असेल तर तो त्यांनी सिद्ध करावा असे सांगत लावण्यात आलेले आरोप मागे घेण्याची विनंती देसाईंनी केली. त्यांचा युक्तिवाद मान्य करताना दाखल करण्यात आलेले आरोप मुंबई पब्लिक ट्रस्टनुसार अवैध असले तरी रेल्वे पोलिस कायद्याखाली असल्याचे सांगत न्यायाधीशांनी त्यांना कमीतकमी दंड आकारण्याची हमी दिली. अशाप्रकारे भीक मागण्यासाठी ५०० रुपये, जोरात बोलण्यासाठी १०० रुपये आणि सरकारी कामात अडथळा आणण्यासाठी १०० रुपये असा एकूण ७०० रुपये दंड देसाई यांना करण्यात आला. लगेच दुसऱ्या एका कामासाठी कोर्टात आलेल्या जोडप्याने हा दंड भरण्याची तयारी दर्शविली. मात्र बॉण्डच्या रूपाने अतिरिक्त पैसे आधीच भरले असल्याचे सांगत देसाईंनी त्यांनी देऊ केलेले पैसे दानपेटी जमा करण्यास सांगितले. त्यांची ही सेवाभावी वृत्ती पाहून एका आंतरराष्ट्रीय बँकेत काम करणाऱ्या या जोडप्याने त्यांचे पाय धरले.

अति कर्तव्यदक्षता

या सर्व प्रकरणात एक लक्षात येईल की, देसाईंविरोधात कुणीही तक्रार केलेली नव्हती. पोलिसांनी स्वयंप्रेरणेने त्यांचे 'कर्तव्य' बजावले होते. वेस्टर्न लाइनवर काम करणाऱ्या रेल्वे पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचा आढावा घेता हे लक्षात येते की, २०१० मध्ये ७३, २०११ मध्ये ९४, २०१२ मध्ये ३४१ आणि २०१३ मध्ये आतापर्यंत ९३ भिकाऱ्यांवर त्यांनी कारवाई केली आहे. कारवाईचे स्वरूप काय तर पकडून कोर्टात हजर करणे आणि नंतर कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी दंड न भरल्यास काही दिवसांची कैद करून त्यांना सोडून देणे. या एकूण आकडेवारीवर नजर टाकता एक स्पष्ट होते की, दिवसाला एक भिकारीही पकडण्याची कर्तबगारीही त्यांनी पार पाडलेली नाही. त्यांनी वर्षभरात पकडले तेवढे भिकारी दररोज एकट्या वेस्टर्न लाइनवर फिरत असतात. पण तरीही देसाईंची सेवाभावीवृत्ती त्यांना खुपली. देसाई दान गोळा करत असताना सर्व कागदपत्रे सोबत घेऊन फिरतात. ट्रस्ट नोंदणीचे प्रमाणपत्र, ऑडिट अहवाल, बँकेचे पासबुक, पैसे भरल्याची पावती, वर्तमानपत्रातील कात्रणे इ. पुरावे सोबत असतानाही ते 'भीक' मागत असल्याचे पोलिसांना वाटले. तेव्हा 'भीक' ही स्वतःसाठी, कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मागितली जाते. देसाई ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी पैसे मागत आहेत. भिकारी अस्ताव्यस्त अवतारात, भाषेत बोलत असतो. देसाई मात्र अतिशय सभ्यपणे मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेमध्ये लोकांशी संवाद साधतात. एकेकाळी मरीन इंजिनीअर, मल्टीनॅशनल कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी, नामांकित कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम केलेले देसाई त्यांना कोणत्या नजरेने भिकारी दिसले याचे उत्तर त्यांनाच ठाऊक.

प्रत्येक लोकलमध्ये रोज किमान ७-८ विक्रेते वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी जोरजोरात मार्केटिंग करत असतात. भिकारी 'वरच्या (बे)सुरात' गाणी म्हणत असतात. त्यांचे आवाज ऐकताना कान बधीर झालेल्या पोलिसांना देसाईंचा आवाज मात्र खूपच जास्त वाटला. बरं देसाईंनी परवानगी मागितली नव्हती, असंही नाही. तीन वर्षापूर्वी त्यांनी रितसर अर्ज केला होता. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. यात त्यांचा काय दोष. हे सर्व प्रकरण झाल्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'माझ्या मनात तुमच्याविषयी अतिशय चांगले विचार आहेत. तुमचे काम अगदी genuine आणि unique असल्याचे सांगत पुन्हा आरपीएफकडून अशाप्रकारचा त्रास होणार नाही याची ग्वाही दिली. तरीदेखील खबरदारी म्हणून परवानगीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी परवानगी देण्याचे अधिकार हाती नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली.' त्यामुळे लवकरच देसाई परवानगीसाठी अर्ज करणार आहेत. तोपर्यंत त्यांच्या कामावर कोर्टाने बंदी घातलेली नसल्याने हे काम पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मात्र भविष्यात अशाप्रकारच्या कामावर बंदी आल्यास पर्यायी मार्गांचा विचार त्यांनी करून ठेवला आहे. एवढे सगळे होऊनही पोलिसांविषयी त्यांच्या मनात कुठलाही राग नसून त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले असे ते नम्रपणे सांगून कुणालाही न दुखावण्याची विनंतीही करतात.

साभार महाराष्ट्र टाइम्स

http://bit.ly/12FQ1zp
Photo: संन्याशाला फाशी  गेल्या आठवड्यात वेस्टर्न रेल्वेवर रेल्वे पोलिसांनी 'एकाला' अटक केली. लोकलमध्ये भीक मागणे, जोरात आवाजात बोलणे आणि सरकारी कामकाजात व्यत्यय आणणे हे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. ही व्यक्ती म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून आहेत प्रा. संदीप देसाई. शाळा उभारणीसाठी लोकांकडून निधी गोळा करणारे. दररोज शेकडो भिकारी, फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष करून पोलिसांनी मात्र संन्यासाला पकडून कर्तव्य बजावले होते...  मुंबईत राहणाऱ्यांना, त्यातही प्रामुख्याने वेस्टर्न लाइनवर राहणाऱ्यांना प्रा. संदीप देसाई माहिती नाही असा माणूस सापडणे कठीणच. नाव माहिती नसले तरी शाळा उभारणीसाठी लोकलमधून दान गोळा करणारा माणून तर नक्कीच सर्वांना माहीत आहे. गेल्या आठवड्यात रात्री १०-१०.३० वाजता लोकलमध्ये नेहमीप्रमाणे दान गोळा करणाऱ्या देसाई यांना रेल्वे पोलिसांच्या एका अति 'कर्तव्यदक्ष' सीनिअर पोलिस इन्स्पेक्टरनी अटक केली. भीक मागणे, जोरात आवाजात बोलणे आणि सरकारी कामकाजात व्यत्यय आणणे हे त्यांनी केलेले गुन्हे. रात्री १०.३० वाजता पकडून त्यांना वांद्र्याच्या पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. कर्तव्यदक्षांनी त्यांची 'इन-कॅमेरा' चौकशीचेही आदेश दिले. सकाळी अटक होईपर्यंत त्यांना 'लॉक-अप'मध्ये ठेवण्याची तयारी कनिष्ठ पदावरील पोलिसांनी सुरू केली होती. कारण वरिष्ठांच्या आदेशापुढे त्यांचा नाईलाज होता. अखेर देसाईंनी आरोपींची चौकशी केल्यावर 'लॉक-अप'मध्ये ठेवण्यालायक एकही गंभीर गुन्हा त्यांनी केलेला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर साडेतीन हजार रुपयांच्या बॉण्डवर सकाळी कोर्टात हजर राहण्याची अट ठेवून त्यांना रात्री २ वाजता घरी सोडण्यात आले. सकाळी कोर्टात न्यायाधीशांसमोर उभे राहताच, न्यायाधीशांनी त्यांना विचारले, 'बोला प्राध्यापक, तुमच्या शाळा कशा सुरू आहेत?'. पुढे सुनावणीत त्यांच्यावरील आरोप त्यांना सांगण्यात आले. त्या देसाई म्हणाले, माझी संस्था मुंबई पब्लिक ट्रस्ट कायद्यानुसार नोंदणीकृत असून त्यानुसार दान गोळा करण्याचा मला हक्क आहे. मात्र रेल्वे त्याला भीक समजते यात माझी काय चूक?. माझ्या कामाचा भाग म्हणून अधिकाधिक लोकांना माझे म्हणणे ऐकून जावे म्हणून मला जोरात बोलावे लागते. आणि जर मी पोलिसांना कामात अडथळा केला असेल तर तो त्यांनी सिद्ध करावा असे सांगत लावण्यात आलेले आरोप मागे घेण्याची विनंती देसाईंनी केली. त्यांचा युक्तिवाद मान्य करताना दाखल करण्यात आलेले आरोप मुंबई पब्लिक ट्रस्टनुसार अवैध असले तरी रेल्वे पोलिस कायद्याखाली असल्याचे सांगत न्यायाधीशांनी त्यांना कमीतकमी दंड आकारण्याची हमी दिली. अशाप्रकारे भीक मागण्यासाठी ५०० रुपये, जोरात बोलण्यासाठी १०० रुपये आणि सरकारी कामात अडथळा आणण्यासाठी १०० रुपये असा एकूण ७०० रुपये दंड देसाई यांना करण्यात आला. लगेच दुसऱ्या एका कामासाठी कोर्टात आलेल्या जोडप्याने हा दंड भरण्याची तयारी दर्शविली. मात्र बॉण्डच्या रूपाने अतिरिक्त पैसे आधीच भरले असल्याचे सांगत देसाईंनी त्यांनी देऊ केलेले पैसे दानपेटी जमा करण्यास सांगितले. त्यांची ही सेवाभावी वृत्ती पाहून एका आंतरराष्ट्रीय बँकेत काम करणाऱ्या या जोडप्याने त्यांचे पाय धरले.  अति कर्तव्यदक्षता  या सर्व प्रकरणात एक लक्षात येईल की, देसाईंविरोधात कुणीही तक्रार केलेली नव्हती. पोलिसांनी स्वयंप्रेरणेने त्यांचे 'कर्तव्य' बजावले होते. वेस्टर्न लाइनवर काम करणाऱ्या रेल्वे पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचा आढावा घेता हे लक्षात येते की, २०१० मध्ये ७३, २०११ मध्ये ९४, २०१२ मध्ये ३४१ आणि २०१३ मध्ये आतापर्यंत ९३ भिकाऱ्यांवर त्यांनी कारवाई केली आहे. कारवाईचे स्वरूप काय तर पकडून कोर्टात हजर करणे आणि नंतर कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी दंड न भरल्यास काही दिवसांची कैद करून त्यांना सोडून देणे. या एकूण आकडेवारीवर नजर टाकता एक स्पष्ट होते की, दिवसाला एक भिकारीही पकडण्याची कर्तबगारीही त्यांनी पार पाडलेली नाही. त्यांनी वर्षभरात पकडले तेवढे भिकारी दररोज एकट्या वेस्टर्न लाइनवर फिरत असतात. पण तरीही देसाईंची सेवाभावीवृत्ती त्यांना खुपली. देसाई दान गोळा करत असताना सर्व कागदपत्रे सोबत घेऊन फिरतात. ट्रस्ट नोंदणीचे प्रमाणपत्र, ऑडिट अहवाल, बँकेचे पासबुक, पैसे भरल्याची पावती, वर्तमानपत्रातील कात्रणे इ. पुरावे सोबत असतानाही ते 'भीक' मागत असल्याचे पोलिसांना वाटले. तेव्हा 'भीक' ही स्वतःसाठी, कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मागितली जाते. देसाई ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी पैसे मागत आहेत. भिकारी अस्ताव्यस्त अवतारात, भाषेत बोलत असतो. देसाई मात्र अतिशय सभ्यपणे मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेमध्ये लोकांशी संवाद साधतात. एकेकाळी मरीन इंजिनीअर, मल्टीनॅशनल कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी, नामांकित कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम केलेले देसाई त्यांना कोणत्या नजरेने भिकारी दिसले याचे उत्तर त्यांनाच ठाऊक.  प्रत्येक लोकलमध्ये रोज किमान ७-८ विक्रेते वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी जोरजोरात मार्केटिंग करत असतात. भिकारी 'वरच्या (बे)सुरात' गाणी म्हणत असतात. त्यांचे आवाज ऐकताना कान बधीर झालेल्या पोलिसांना देसाईंचा आवाज मात्र खूपच जास्त वाटला. बरं देसाईंनी परवानगी मागितली नव्हती, असंही नाही. तीन वर्षापूर्वी त्यांनी रितसर अर्ज केला होता. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. यात त्यांचा काय दोष. हे सर्व प्रकरण झाल्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'माझ्या मनात तुमच्याविषयी अतिशय चांगले विचार आहेत. तुमचे काम अगदी genuine आणि unique असल्याचे सांगत पुन्हा आरपीएफकडून अशाप्रकारचा त्रास होणार नाही याची ग्वाही दिली. तरीदेखील खबरदारी म्हणून परवानगीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी परवानगी देण्याचे अधिकार हाती नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली.' त्यामुळे लवकरच देसाई परवानगीसाठी अर्ज करणार आहेत. तोपर्यंत त्यांच्या कामावर कोर्टाने बंदी घातलेली नसल्याने हे काम पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मात्र भविष्यात अशाप्रकारच्या कामावर बंदी आल्यास पर्यायी मार्गांचा विचार त्यांनी करून ठेवला आहे. एवढे सगळे होऊनही पोलिसांविषयी त्यांच्या मनात कुठलाही राग नसून त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले असे ते नम्रपणे सांगून कुणालाही न दुखावण्याची विनंतीही करतात.  साभार महाराष्ट्र टाइम्स  http://bit.ly/12FQ1zp

0 comments:

Post a Comment